ताज्या घडामोडी

अतिक्रमणीत जागेवरील दुकाने हटवावी

माजी आमदार अब्दुलाखान उर्फ बाबाजानी दुर्राणी यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
.
पाथरी शहरातील माजलगाव रोडवरील सर्वे नंबर १/१ अतिक्रमणित दुकाने हटविण्याबाबत पाथरीचे विधान परिषदेचे माजी आमदार अब्दुलाखान उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्ताकडे केली आहे
१/१पाथरी ही मिळकत पाथरी नगर परिषदेच्या मालकीची असून सदर मिळकत विकास आराखडा मध्ये साईट क्रमांक 33 अन्वये शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी आरक्षित असून सदरील मिळकतीवर एकूण 54 लोकांनी दुकाने उभारली असून सदर व्यक्तीकडे भाडेकरार नामे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 92 अंतर्गत नियमबाह्य असून या व्यक्तींचा ताबा अनधिकृतझालेला आहे सदरील अतिक्रमित व्यक्तीविरुद्ध नगरपरिषद पाथरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे जागा रिकामी करण्याबाबत प्रकरणी दाखल केली त्याचा निर्णय दिनांक 20 सात 2022 रोजी नगरपरिषद सारखा झाला आहे सदरहू अतिक्रमित लोकांनी माननीय जिल्हा न्यायालय परभणी येथे अपील दाखल करून ते प्रलंबित आहे व माननीय उच्च न्यायालयाने आदेशान्वये ती प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावी असे निर्देशही आहेत असे असताना सद्यस्थितीत नगरपरिषद पाथरी येथे प्रशासक नियुक्त आहे सदर प्रकरणाबाबत सदर अतिक्रमित धारक व मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी व उपविभागीय अधिकारी पाथरी यांचे संगनमताने तडजोड करण्याचा प्रयत्न करीत असून नगर परिषदेतर्फे याच अतिक्रमित लोकांना पुन्हा दुकाने बांधकाम झाल्यानंतर देण्याचा प्रयत्न चालू आहे जे की नियमबाह्य आहे प्रशासकीय अधिकारी यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची कोणतेही अधिकार नसतात असे असतानाही नियमबाह्य तडजोड करून नगरपरिषदेचे मिळकतीचे वर अनधिकृत लोकांना कायम ठेवण्याबाबत निर्णय घेणे हे न्यायाची दृष्ट्या अयोग्य आहे त्यामुळे या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी जातीने लक्ष घालून प्रशासकीय अधिकारी यांना असे कोणतेही निर्णय न घेता न्यायालय निर्णयाप्रमाणे कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद कडे दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close