ताज्या घडामोडी

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नपूर्णा उपहारगृहाचे मा. माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मुल व वृंदावन प्रभासंघ डोंगरगाव यांचे वतीने पंचायत समिती कार्यालय मुल येथे अन्नपूर्णा उपहारगृहाचे उद्घाटन मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार बल्लारपूर, विधानसभा क्षेत्र यांचे उपस्थितीत करण्यात आले.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. संध्याताई गुरनूले अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल, मा. सौ. जयश्रीताई वलकेवार उपसभापती पंचायत समिती मुल, मा. पूजाताई डोहने पंचायत समिती सदस्य मुल, मा. डॉ. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल मा.श्री. गजानन ताजने सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक जि. अ. व्य. कक्ष चंद्रपूर, रोशन साखरे सर, जिल्हा व्यवस्थापक जि. अ. व्य. कक्ष चंद्रपूर, राजेश दुधे सर, तालुका अभियान व्यवस्थापक ता. अ. व्य. कक्ष पोभूर्णा, सौ. आरिफा भसारकर, वृंदावन प्रभाग संघ अध्यक्ष, सुवर्णा आकनपल्लीवार, तुलसी प्रभागासंघ, सुनंदा वनकर, यशस्वी प्रभागसंघ कोषाध्यक्ष उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देणारा एक दिवसीय महोत्सवाला मूल तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर अन्य वस्तूंना मोठी मागणी आहे.
यावेळी मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार बल्लारपूर, विधानसभा क्षेत्र यांनी ग्रामीण भागात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह निर्माण झाले असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागात महिलांनी स्वयं रोजगारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उत्पादक गटांनी निर्माण केलेले विविध प्रकारच्या वस्तूचे प्रदर्शनी भरविण्यात आली होती त्यात समूहाने तयार केलेले बांबू पासून बनवलेले विविध वस्त, कापडापासून बनवलेले उबदार वस्तू, एलईडी लाईट, पापड, कुरडी, अगरबत्ती, परफ्युम, निरमा, मशरूम पासून बनवलेले बिस्किट, लोणचं, पापड व आदी पदार्थ तसेच समूहाने तयार केलेले परसबागेतील भाजीपाला तथा सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले ब्लॅक राईस, लाखेची दाड शेतकऱ्यास उपयुक्त गांडूळ खत व दशपर्णी अर्क, घरगुती शोभिवंत वस्तू इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा. माया सुमटकर तालुका अभियान व्यवस्थापक, मा. प्रकाश तुराणकर तालुका व्यवस्थापक, मा.निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, मा. स्नेहल मडावी तालुका समन्वयक सेंद्रिय शेती, मा. जयश्री कामडी तालुका समन्वयक, मा. अमर रंगारी प्रभाग समन्वयक, मा. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, मा. रुपेश आदे प्रभाग समन्वयक (सेंद्रिय शेती ), मा. वसीम काझी प्रशासन सहाय्यक तथा लेखापाल, मा.मयूर गड्डमवार (कृषी व्यवस्थापक ), सौ .भावना कुमरे प्रभाग संघ व्यवस्थापक, श्री.मयूर भोपे, श्री. गिरीधर चरडुके, सौ. आरिफा भसारकर प्रभाग संघ अध्यक्ष या यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close