ताज्या घडामोडी

वाघनख शाळेत सौ.सविता पिसे अध्यक्षा तर प्रकाश रामटेके उपाध्यक्ष

जि. प.उ.प्राथमीक शाळा वाघनख शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी सविता पिसे तर उपाध्यक्षपदी प्रकाश रामटेके यांची एकमताने निवड.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यात आले यामध्ये वर्ग १ ते ७ च्या सर्व पालकांना निमंत्रीत करुन पालक सभा घेण्यात आली.प्रत्येक वर्गाच्या पालकातून सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली. यात ५०% महिला तसेच एससी, एसटी दुर्बल घटकांतील प्रतीनीधींनाही संधी देण्यात आली. एक शिक्षण प्रेमी सदस्य,शिक्षक प्रतीनीधी,विद्यार्थी प्रतिनीधी मुलगा, मुलगी यांची निवड करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत प्रतिनीधीसाठी मागणी करण्यात आली.निवड झालेल्या पालक सदस्यामधून अध्यक्ष व उपाध्यक्षाची सर्वानुमते एकमताने खालीलप्रमाणे निवड करण्यात आली.
सविता जयवंत पिसे (अध्यक्षा),प्रकाश प्रशांत रामटेके (उपाध्यक्ष),सिमा सुभाष सावरकर(सदस्या),.वनिता बाबाराव जेंगठे(सदस्या),.गंगा गजानन शेळके(सदस्या), चंद्रकला चंद्रभान नैताम(सदस्या)कल्पना वामन पिसे(सदस्या),अरुण विठ्ठल गराड(सदस्य),प्रविण महादेव गावुत्रे(सदस्य),प्रविण ज्ञानेश्वर ढोले(शिक्षण प्रेमी),संतोष शंकरराव धोटे(शिक्षक प्रतिनीधी),परी गजानन शेळके(विद्यार्थीनी प्रतिनीधी),हितेश देवेंद्र कळसकर (विद्यार्थी प्रतिनीधी),
रामचंद्र बालाजी सालेकर मुख्याध्यापक (सचिव)
याप्रमाणे शालेय व्यस्थापण समितीची कसलाही मतभेद न होता आनंदी वातावरणात शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करुन समितीची निवड करण्यात आली. बहुसंख्य पालक सभेला उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी शालेय व्यवस्थापण समिती स्थापणा संबंधी मार्गदर्शन केले.सभेचे सुत्रसंचालन धनराज रेवतकर सर विज्ञान शिक्षक यांनी केले, तर सभेचे वृत्तलेखन संतोष धोटे सर स.शिक्षक यांनी केले याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी कटीबद्ध राहू अशा भावना व्यक्त केल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close