ताज्या घडामोडी

केंद्रिय मंत्री राव दानवे यांची मा. पंतप्रधान महोदय यांना निवेदनाद्वारे तक्रार

केंद्रिय मंत्री राव दानवे यांचा जाहीर निषेध – नाभिक (सैन) समाजाला जाहीर माफी मागावी निवेदनाद्वारे मागणी.

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दि. 10/3/2022 महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तुमसर च्या सहकार्याने आज दि. 10/03/2022 रोजी तहसीलदार साहेब तुमसर. पोलिस निरीक्षक तुमसर मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारत सरकार यांना केंद्रिय मंत्री राव दानवे यांच्या विरोधात नाभिक (सैन) समाजाचा अपमान केल्याबाबद त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा घ्यावे असे निवेदन देण्यात आले. केद्रिय मंत्री दानवे यांनी नुकत्याच जालना येथील सभेत महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर टिका करताना, “तिरुपती बालाजी येथील मंदिरात केशकर्तन करणारे नाभिक (सैन) हे जसे धरसोडीचे व्यवसाय करतात तसे कार्य महाराष्ट्र सरकारचे चालले आहे” असे चुकीच्या पद्धतीने उदाहरण दिल्यामुळे देशातील नाभिक (सैन) समाजाच्या भावना दुखावल्या असून देशातील मोठ्या गरीमामय पदावर राहून दानवे यांच्या असभ्य व संस्कारहीन भाषणाबाबद केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा व दानवे यांनी समस्त नाभिक (सैन) समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा नाभिक समाज तीव्र असे आंदोलन करेल याची सरकारने नोंद घ्यावी असे
निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तुमसर तालुका अध्यक्ष लोकेश चावके रवि नागमोते .माधोराव पारधी जयकिशन चावके.बापु चावके.अमोल श्रीवास लीलाधर लांजेवार.राजु लांजेवार.महेश उरकुडे.शुशिल सुर्यवंशी.मधु भारद्वाज .
द्वारे देण्यात आले व दानवे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close