अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबरला आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यास सकल मराठा समाजाने उपस्थित राहावे -नितीन देशमुख संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्वीपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधवास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आरक्षण संदर्भात १४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे होत असलेल्या जाहीर सभेला सकल मराठा समाजाने उपास्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन भैया देशमुख यांनी केलेले आहे.
सरकारने आत्तापर्यंत अनेक आश्वासने देऊन नवनवीन शासन आदेश काढुन समाजाची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषणाला अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. आंदोलन मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला गेला होता. एवढे करूनही महिला व पुरुषांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. एवढे होऊनही जरांगे पाटील हटले नाहीत म्हणून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यांना दहा दिवस वाढीव मुदत दिली होती त्यानुसार येत्या १४ ऑक्टोबरला शासनाने आश्वासन देऊन एक महिना पूर्ण होत असल्याने या दिवशी सरकारला एक इशारा म्हणून अंतरवाली सराटी येथेमनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवाने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केले आहे.