ताज्या घडामोडी

सरडपार येथे बालसुसंस्कार शिबीर संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चिमूर तालुक्यातील जवळच असलेल्या मौजा सरडपार येथे चिमुर तालुका ग्रामजयंती प्रचार व प्रसार समितीचे वतीने व श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपारचे सहकार्याने मौजा सरडपार ता.चिमुर येथे सात दिवसीय दि २०एप्रील ते २७ एप्रिल २०२४ पर्यंत बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चिमुर तालुक्यातील बारा गावातील व सिंदेवाहि,भिवापुर तालुक्यातील एकुण ९२शिबीरार्थी सहभागी झाले होते. सदर शिबिरात सामु ध्यान, प्रार्थना,योगा प्राणायाम, सुर्य नमस्कार, लाठीकाठी,कराटे, बौद्धिक ज्ञान इ.विषयाचे ज्ञान देण्यात आले.यासाठी लाठीकाठी शिक्षक गजानन ठाकरे, विष्णू बारेकर संगीत शिक्षक गजानन आत्राम, योगा शिक्षक हरिश्चंद्र धोंगडे यांनी शिक्षणाचे धडे दिले

व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेटि देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.समारोपीय कार्यक्रम दि २७/४/२०२४ ला आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मिलींद सुफले ब्रम्हपुरी व पेंदुरकर , देवराव भुरे महाराज व परिसरातील कार्यकर्ते , विद्याथ्याचे पालक उपस्थित होते.सर्वांच्या उपस्थितीत मुलांनी मनोगत,भजने, लाठीकाठी कराटे प्रात्याक्षीके ,सादर केली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंद देवतळे यांनी केले तर प्रास्ताविक आनंदराव कडुकार यांनी केले तर शीबीर यशस्वीतेसाठी टिकारामजी वाघमारे,संजय ठाकरे, नितेश वाकडे, हरिश्चंद्र धोंगडे, दिलीप नन्नावरे,वामन बोरकर, चरणदास पोईनकर, प्रकाश गोहणे, सुधाकर पिसे,रुपेश धारणे,कमलताई गुडधे, यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close