राज्यपालांच्या विरोधात परभणीत राज्यपाल व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांना जोडो मारो आंदोलन
राज्यपालांना हटविण्याची शिवप्रेमींची मागणी .
जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी
जाणिवपूर्वक नेहमी महापुरुषांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांनी केलेल्या विधानाचा शिवप्रेमींकडून परभणीत आज सोमवार रोजी तीव्र निषेध व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
यावेळी कोश्यारींविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर रनेर,स्वराज्य संघटनेचे तथा संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते, मराठा सेवा मंडळ शहर जिल्हाप्रमुख गोविंद इककर, युवासेनेचे अर्जुन समाले राहुल खटिंग,बालाजी जावळे, राजु ताटे,योगेश शिराळे शरद घाडगे, गोरख मोहिते, हनु लिंगे प्रसाद देवके, अमोल अवकाळे, अंगद मस्के, यांच्यासह अनेक शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त व वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना घटनात्मक पदावरून तात्काळ हटवावे या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज दुपारी तीव्र निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी होते. यामुळे देशातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे, कामगारांचे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून राज्यपाल व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशी बेताल विधाने करत आहेत. याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना,मराठा सेवा मंडळ व सर्व शिवप्रेमींच्या वतीनेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करून राज्यपालांना हटविण्याची मागणी करण्यात आली.