केश शिल्प मंडळ” चे पुनरुज्जीवन विद्यमान राज्यशासनाने करावे

संघर्ष अभी जारी है
प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा च्या शिष्टमंडळाने प्रदेश उपाध्यक्ष श्री श्यामजी आस्करकर यांचे नेतृत्वात राज्यातील सत्तारूढ “मविआ” सरकार चे संयोजक/समन्वयक
शिवसेना खासदार श्री संजय राऊत यांचे नागपूर आगमन प्रसंगी शिवसेना भवन नागपूर येथे भेट घेऊन नाभिक समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न “केश शिल्प मंडळ” चे पुनरुज्जीवन विद्यमान राज्यशासनाने करावे, आणि नाभिक समाजाला, सलून व्यवसायास प्रगतीची संधी देत न्याय द्यावा, हि कळकळीची आग्रही विनंती केली. खासदार राऊत साहेबां नी सगळी बाब लक्षपूर्वक ऐकत याप्रसंगी स्वतः जातीने लक्ष घालील व मुख्यमंत्री यांचे पर्यंत पोहचवतो, असे शिष्टंडळास सांगितले.
तसेच…नाभिकांच्या अस्मितेचा प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे अवमानकारक उदगार व त्यांचे विरुद्ध नाभिक समाज, संघटनेचा रोष व्यक्त करीत समाजात तीव्र रोष असून समाज आंदोलन करीत आहे, याविषयी संसदेत किंवा पंतप्रधान यांचे पर्यंत ही बाब नेऊन नाभिक समाजास न्याय मिळवून देण्यास सहाय्य करण्याची विनंती शिष्टमंडळाने यावेळी केली._
यावेळी शिष्टमंडळात महिला जिल्हाध्यक्ष सौ अर्चना कडू, जिल्हा सरचिणीस राजेंद्र इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष राजू चिंचाळकर, सचिव विणेश कावळे, संघटक योगेश नागपूरकर, विनोद जमदाडे, पूर्व नागपूर अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, महिला संघटीका सौ मंजुषा पाणबुडे, दक्षिण पश्चिम महिला अध्यक्षा सौ स्मिता नक्षणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघर्ष अभी जारी है…
लढणे की तयारी है.. !!