ताज्या घडामोडी

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील दिनांक 20 नोव्हेंबर 24 बुधवार रोजी भरत असलेले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी, मानवत व सोनपेठ येथील मुख्याधिकारी नगर परिषद यांना व ग्रामीण भागासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत ज्या मुळे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांना मतदान करता येईल तसेच मतदानाच्या दिवशी शासनाने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे यात सर्व खाजगी आस्थापना, खाजगी कारखाने, सर्व दुकाने, हॉटेल अत्यावश्यक सेवा वगळता यांना आपल्या आस्थापना बंद ठेवण्याचे किंवा आपल्या आस्थापनेवर काम करणारे कर्मचारी यांना पूर्ण पगारी रजा किंवा दोन तासाची त्यांना मतदान करेपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून सर्व खाजगी अस्थापना यांनी शासनाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी केले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close