पुयारदंड ते गोठणगाव रस्ता डांबरीकरण करा
गावकऱ्यांची कार्यकारी अभियंता, जि .प. बांधकाम विभाग चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी.
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
पुयारदंड ते गोठणगांव या रस्त्याचे काम मागील ५ ते ६ वर्षापूवी डांबरीकरण केलेले होते . परंतु दोन वर्षापासुन संपुर्ण रस्ता खराब होवून त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत . या रस्त्यावरून ये – जा करतांना परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .पूर्ण रस्ताच खराब आहे. पावसाळ्यात तर रस्त्याची खूपच दयनीय अवस्था होते. गावकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा रोज या रस्त्याने जीव मुठीत घेऊन पायदळ येणे जाणे करावे लागते.
म्हणून कोणतीही अनुचित घटना घडणेआगोदर ह्या रस्त्याचे डांबरीकरण होने गरजेचे आहे अशी गावकऱ्यांची कळकळीची मागणी आहे. रस्ता पूर्ण डांबरीकरण झाल्यास लोकांच्या पायपीटीचा त्रास तसेच अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी होईल. करिता मा. कार्यकारी अभियंता, जि .प. चंद्रपूर यांचेकडे गावकऱ्यांकडून निवेदन देऊन रस्ता पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. गावकऱ्यांतर्फे सामाजिक कार्यकर्ता- कमलाकर बोरकर, संदीप खंडाळ, तेजराम गारघाटे, बालु डोये आणि ग्रा. पं. गडपीपरी सदस्य सुधाकर वाकडे यांनी दि. ४/१०/२०२१ ला प्रशासनास निवेदन दिले.