रायगट्टा येते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील रायगट्टा येते भजरंग सि, सि क्रिकेट क्लब यांच्या कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक ग्रामपंचायतचे माझी सरपंचा श्रीमती शकुतलाताई माधव कुडमेथे व ग्रामपंचायतचे सचिव एस, एस सडमेक मॅडम कडून तसेच तिसरा पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भाऊ तलांडे असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माझी सभापती भास्कर भाऊ तलांडे होते,तर यावेळी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद माजी सदस्य श्री.अजय नैताम राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, अँड एच के आकदर मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी,रायगट्टाचे माझी सरपंचा शकुतलाताई कुडमेथे, राजारामचे माझी सरपंचा जोतीताई जुमनाके,रंगा आलाम पेसा अध्यक्ष दीपक अर्का,मधुकर गोंगले, व्येकय्या कर्डालावार शंकर दुर्गे, रमेश पोरतेट, सत्यनारायण बात्तूलवार, रामशंकर अंबिलीपवार,कार्तिक तोगम,आदि होते.
तर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री, सुरेश्चंद्र जुमनाके सर यांनी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष तिरुपती चिंतावार, उपाध्यक्ष महेश जाकेवार, सचिव संपत चिटकला सहसचिव सुरेश आलमवार सहसचिव श्रीसागर अंबीलपवार व गावातील नागरिक उपस्थित होते.