मिठाई कारखाना बंद करा गोंदियातील नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
निवेदन देऊन तीन महिने झाले परंतु अधिकार्यांचे दुर्लक्ष
जनतेने न्याय मागावे तरी कुणाकडे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
गोंदिया येथील डॉ.लोहिया वार्ड क्रमांक 11 मध्ये तिरोडा रोड विजय मेडिकल च्या मागे एक महिन्यापासून दिवाळीच्या सुरुवातीपासून येथे मिठाई बनविण्याचा कारखाना सुरू झाला आहे .या मालकाचे नाव हॉटेल शालीमार रिंग रोड कुडवा नाका असे आहे .मिठाई व नमकीन बनविण्याकरिता दूध, पनीर,दही साखर ,बेसन ,रवा मैदा,आटा चा वापर केला जातो. परंतु ते तयार करत असताना खराब मटेरियल निघत असतो. तो नालीत टाकल्या जातो. नालीत टाकल्यामुळे येथे डुक्कर ,कुत्रे राहतात. आणि गंदगी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत असते हे माणसाच्या जीवितास हानीकारक असून मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदासी निर्माण होऊन जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे परिसरातील लोकांना खिडक्या दारे दरवाजे बंद करून रहावे लागते .त्यामुळे येथील मिठाई नमकीन चा कारखाना बंद करण्यात यावा. अशी येथील परिसरातील नागरिकांनी 22 /11, /2021ला जिल्हाधिकारी साहेब गोंदिया यांच्याकडे लेखी तक्रार केली होती .परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे आहे .याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष गोंदिया ,मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद गोंदिया, उपविभागीय अधिकारी अधीक्षक अन्न व औषधी कार्यालय गोंदिया , नगरसेवक हेमलता अक्षय कुमार, धर्मेंद्र अग्रवाल यांना देण्यात आलेली होते परंतु आज तीन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जनतेने न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न नागरिकांना निर्माण झालेला आहे.