ताज्या घडामोडी

कमलापूर शाळेत शहीद दिन आणि केंद्रप्रमुख श्री,मस्के सर यांचा सन्मान सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 23 मार्च 2022 वार बुधवार रोजी जि .प. प्रा .शा. कमलापूर पूर्णा शाळेस केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मस्के सर यांनी अचानक भेट दिली. शालेय परिसराची पाहणी केली तसेच प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन केंद्रप्रमुखांचे स्वागत केले.श्री,मस्के सरांनी मुलांना प्रश्न विचारून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.तिसरी आणि चौथीच्या वर्गातील उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती असलेल्या मुलांचा त्यांनी सत्कार केला. दुपारच्या सत्रात जि. प. प्रा. शा.कमलापूर आयोजित शहीद दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख यांनी उपस्थिती लावली.या वेळी थोर क्रांतिकारक भगतसिंग आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी भगतसिंग,राजगुरू,सुखदेव या थोर क्रांतिकारक यांच्या जीवनावर अर्चना कोळेकर,कल्याणी जगताप,अंकिता मासे,श्रेया सूर्यवंशी आदींनी भाषणाद्वारे प्रकाश टाकला.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री,पलये सर,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष श्री,प्रल्हाद कोळेकर,श्री ,गोविंद गव्हाणे, सर्व शिक्षक आदींनी शाळेच्या वतीने श्री,मस्के सर यांचा शाल,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.तसेच शाळेतील शिक्षक श्री महेश जाधव यांना पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक,शाळा व्य. समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केंद्रप्रमुख श्री,मस्के सरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना बोलते करून संवाद साधत अनमोल मार्गदर्शन केले.स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगितले.भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याची ओळख करून आपण ही आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात असे सांगितले.
या प्रसंगी इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री,राठोड सर आणि इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कुणाल जोंधळे(आदर्श विद्यार्थी) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री,पलये सर होते.सुत्रसंचलन श्री,रत्नपारखे सर यांनी तर आभार श्री, जाधव सर यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री,जाधव सर,आबुज सर,राठोड सर यांनी मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close