संत गाडगेबाबांचे विचार प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचवा …खा. अशोक नेते
सेवा परमो धर्म संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव सोहळा ब्रह्मपुरी
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
श्री.संत गाडगेबाबा महाराज मिशन मुंबई संचलित संत गाडगेबाबा महाराज स्मारक धर्मशाळा ता.ब्रम्हपुरी ह.भ.प. उजेडे महाराज स्मरणार्थ सेवा परमो धर्म संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव सोहळा ब्रह्मपुरी येथे विविध कार्यक्रमाने तसेच महाप्रसादाने आयोजित केला होता.
या महोत्सव सोहळ्याला खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करतांना संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन, समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध, अंधश्रद्धेवर खरा धर्म शिकवला. भुकेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले, त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करणारे एकमेव संत गाडगेबाबा होते.त्यांचे विचार प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
यावेळी खासदार नेते यांनी महाप्रसाद वाटून महाप्रसादाचा आस्वाद व आनंद घेतला.
याप्रसंगी नगराध्यक्षा रिताताई उराडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी गडचिराली जिल्हा परीषद सभापती रंजिता कोडापे, स्मीता पारधी, नगरसेवक हितेंद्र राऊत,सचिन राऊत, नामदेवराव ठाकुर, नारायणराव बोकडे, श्रीराम करंबे, सतिश डांगे, उत्तम बनकर, श्रीधर नागमोती, प्रशांत डांगे, भास्कर जांभूळकर, कमलाकर उजेडे, ज्योत्स्ना उजेडे, विहार मेश्राम, सचिन निशाने, जगदिश बावनकुडे, महेश पिलारे, रविंद्र तुपट, मनोहर कावळे, गोवर्धन दोनाडकर, धनेश राखडे, गुलशन मेश्राम, मनोज शिंगाडे, मंगेश शेंडे तसेच मोठ्या संख्येने भाविक फक्त उपस्थित होते.
प्रास्तावीक शाखेचे संचालक डॉ ललित उजेडे यांनी केले.