डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व विद्यार्थ्यांचे ऐकमेव सिम्बॉल ऑफ नॉलेज -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन म्हणजे शैक्षणिक क्रांती ची नव्या युगाची सुरवात होती इतिहासाला कुश बदलावयाला लावनारी घटना होय
भारताच्या दृस्टीने नवी पिढी घडवनारा नवनिर्मानाचे स्व्प्न पेरनारा तो दिवस हा सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे बाबासाहेब यांचे जीवनच संगर्ष होते पन त्या संघर्षातुन आपल्या ज्ञानाने कार्यकर्तुत्वाने अवघ्या जगाचे डोळे दिपवले जगातील सर्व विद्यार्थ्यांना अंखड स्पुर्ति बनवून जगातील विद्यार्थिचे टाईट बनले म्हनुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे महामानव आहेत ते सर्व जगातील विद्यार्थीसाठी सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी शहिद वाचनालय नगरपरिषद चिमुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिम्मीत आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या
या कार्यक्रमाचे अद्यक्ष ग्रंथपाल अजय मेश्राम होते तर प्रमुख अतिथी प्रा.किशोर चटपकार,प्रा.अक्षय मातीखांदे, सचिन रामटेके ,मयुर इंदुरकर ,अंकित इंदुरकर , स्पर्धा परिक्षाची तयारी करनारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जगभरातिल विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी उत्सुक असतात येवढी प्रंचड विद्वत्ता प्राप्त केली बाबासाहेब यांनी तरी स्वत आजीवन मी विद्यार्थी आहे असे आदर्श विद्यार्थी ठरले बाबासाहेब यांच्या दृस्टीने विद्यार्थी कसा असावा विद्यार्थीनी काय शिकावे त्यासाठी विद्यार्थीनी पंचतत्वावर आपले चरित्र बनवीले पहिजे प्रज्ञा,शिल करुना,विद्या मैत्री हे गुन अंगिकारले पहिजे उच्च शिक्षण हे जिवन उंचावन्यासाठी आहे शिक्षण हे अस्तित्वाची क्षमतेची,सामर्थ्यची जानीव करुण देते विद्यार्थीजवळ शिल फार मह्त्वाचे आहे शिक्षण कितीही घेतले आनी जर विद्यार्थीना शिल नसले तर तो कितीही शिकला तर तो समाजाच्या वीनाशाकरिता आपल्या बुधिचा वापर करेल त्यामूळे बाबासाहेब यांनी निष्कलंक चरित्राला आपल्या जीवनात फार मह्त्व दिले फक्त विद्यार्थी नी शिक्षणच घेवू नये तर चांगल्याप्रतिचे शिक्षण घ्यावे आपली लायकी विद्यार्थीदशेतच वाढवावी व्यसनापासुन अलिप्त असावे वाचन लिखान यांचे वेड असावे जे शिक्षण घेणार त्यात स्वतची ओळख निर्माण करावी जर तुमच्याकडे दोन रुपये असतिल तर एका रुपयाची भाकरी घ्यावी आनी ऐका रुपयाचे पुस्तक घ्यावे भाकरी फक्त तुम्हाला जगण्यास मदत करेल परंतु पुस्तक कसे जगायेचे हे शिकवेल मी गरिब आहे म्हणून परीस्थितीला दोषी ठरवू नका जो विद्यार्थी पुस्तकाला आपला खरा मित्र सारथी मानेल तो जीवनभर सन्मनित राहतो असे विचार बाबासाहेब यांना सर्व विद्यार्थ्याब्द्द्ल अपेक्षीत होते तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या या आदर्श विचारांचा आपल्या जीवनात उपयोग करावा व स्वतचा समाजाची देशाची प्रगती करावी आजच्या विद्यार्थ्यांना तर बाबासाहेबासारखी बिकट परिस्थिती नाही आहे तरी विद्यार्थी नैराश्य चैनित कधी आत्महत्याकडे वळतो निगेटिव्ह विचार करतो बाबासाहेब यांनी सहन केलेले दुख अभ्यास चिकाटी जिद्द स्वाभीमान विद्या शिल मनात मेंदूत सर्व विद्यार्थ्यानी डोळ्यासमोर ठेवावी असे स्विस्तर मार्गदर्शन यावेळी समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रांजली मानकर यानी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री ठवस हिने केले