ताज्या घडामोडी

गंगाखेड शहरातील प्रभाग क्र.२ मध्ये आ.गुट्टे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार स्थानिक विकास निधीतून दिलेल्या कामासह राज्य शासनाकडून खेचून आणलेल्या निधीच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा सपाटाच लावला आहे.
दिनांक ८ ऑगस्ट रविवार रोजी गंगाखेड शहरातील रा.स.प. चे नगरसेवक सत्यपाल साळवे यांच्या प्रभाग क्रं. २ मध्ये रमजान नगर व विठ्ठल रुक्मिणी नगर येथे नगरोत्थान योजनेतून ४३ लक्ष रुपयांच्या विकास निधीतून रस्ता,नाली व पेव्हर ब्लॉक रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सत्यपाल साळवे, सुनील काका चौधरी, ॲड.संदीप आळणुरे, दीपक तापडिया, शेख खालीद, एकबाल चाऊस, राजू खान, अहमद खान, प्रदीप शिंदे व पत्रकार बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close