गुरुवारपासून परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरची पालखी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दर गुरुवारी श्रीसाईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात येते, परंतु मागच्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे मंदिर आवारातच काढल्या जात होती.
परंतु आता लॉक डाऊन नंतर प्रथमच गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 पासून मंदिर आवाराच्या बाहेर श्रीसाईबाबांची पालखी दक्षिण गेटने दिवान गल्ली बागवान गल्ली सोमेश्वर मंदिरा मार्गे हनुमान मंदिर परत दक्षिण गेटने मंदिरात या मार्गे पालखी चे नियोजन करण्यात आले आहे. पालखीसोबत अबदागिरी, चोपदार, छत्रधारी तसेच परम पूज्य श्रीसाईबाबांची प्रतिमा घेऊन पुजारी टाळ विणा मृदंगाच्या गजरात हे पालखी सायंकाळी धुपारती नंतर निघणार आहे. तरी या पालखी महोत्सवास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीसाई स्मारक समिती पाथरीच्या वतीने करण्यात येत आहे.
अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी अॅड.मुकुंदराव चौधरी यांनी दिली.