रेणापूर येथे विविध प्रकारचे प्रमाणपत्र, कृषी विभागाचे साहित्य व विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’अंतर्गत नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे लक्ष ठरवून दिले असून त्या अनुषंगाने आज मौजे रेणापूर येथे विविध प्रकारचे प्रमाणपत्र, कृषी विभागाचे साहित्य व विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटपाचा व ऊसतोड कामगार मेळावा शुभारंभ केला.
नागरिकांची कामे वेळेत पूर्ण झाली तरच प्रशासनाला अर्थ असतो त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयाने 2 ऑक्टोंबर पर्यंत सर्व प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढायचा आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. जे अर्ज व तक्रारी या कालावधीमध्ये निकाली निघणार नाही त्याचे स्पष्ट कारण देऊन अहवाल सादर करण्याचा सूचना यावेळी दादासाहेब टेंगसे यांनी दिल्या.
उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी अंगणवाडीत चिमुकल्या सोबत घेतला खाऊ चा आनंद
याप्रसंगी माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब,उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे मॅडम,तहसीलदार सुमन मोरे मॅडम,कार्यालय अधीक्षक गुंडरे साहेब , गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड,युवा नेते संदीप भैया टेंगसे,ग्रामसेवक संदिपान घुंबरे,सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य,तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सीडीपीओ, शासकीय अधिकारी, कर्मचारी,व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संदीप भैया टेंगसे यांनी केले तर सूत्रसंचालन थोरे मॅडम यांनी केले तर आभार ग्रामसेवक संदिपान घुंबरे यांनी मानले .