ताज्या घडामोडी

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन थाटात साजरा

मान्यवरांच्या उपस्थितीत सुंदर माझा दवाखाना मोहीमेचा उद्घाटन कार्यक्रमही पार पडला

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

शुक्रवार दि. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन!एक प्रकारे जनजागृती ,प्रचार आणि प्रसार करण्याचा‌ दिवस ! याच दिनी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात खासदार बाळु धानोरकर यांनी रेड रिबीन कापून व दिप प्रज्वलन करून जागतीक आरोग्य दिन सोबतच व सुंदर माझा दवाखाना ह्या महाराष्ट्र शासनाच्या मोहीमेचे अतिशय थाटात उद्घाटन केले . आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खा.धानोरकर
यांनी विभूषित केले होते.सदरहु कार्यक्रमा प्रसंगी चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेवराव चिंचोळे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद किन्नाके सुभाष दांदडे , वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकुश राठोड अधीसेविका वंदना बरडे आदीं मंचावर उपस्थित होते.या सर्वं मान्यवर मंडळींनीच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला .या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .चिंचोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. खा. बाळु धानोरकर यांनी आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोना काळात वरोरा रूग्णालयातील सर्व कर्मचारी बांधवांनी दिवस रात्र अतिशय मेहनत घेत रुग्णांची सेवा करीत त्यांचे प्राण वाचविले. या बद्दल कर्मचारी बांधवांचे खा.बाळू धानोरकर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.सदरहु कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभारे यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार येडे यांनी मानले.आयोजित कार्यक्रमात अधिसेविका वंदना विनोद बरडे यांनी आरोग्याची सेवा शपथ पुस्तिकेचे वाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिसेविका वंदना विनोद बरडे,परिसेविका कापटे, परिसेविका कोडापे, कुमरे, परिसेविका पूसनाके रुयीकर मोगरे, सूजाता जूनघरे, खडसाने यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close