क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती सोहळा संपन्न
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा 147वा जयंती सोहळा मंगळवारला बिरसा मुंडा चौक चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आँल इंडिया पँन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक तुमराम ,अशोक ऊईके, रूपेश निमसरकार, संगिता येरमे, वंदना गेडाम, संतोष डांगे, राजेन्द्र धुर्वे, विजयसिंह मडावी, कृष्णाजी मसराम, कमलेश आत्राम, जितेश कुळमेथे डाँ .शारदा येरमे आदीं उपस्थित होते.आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी केले. उपस्थितीतांचे आभार बिरसा सेना जि. अध्यक्ष कमलेश आत्राम यांनी मानले.सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती जुमनाके, शंकर ऊईके, सुरज गावडे,त्यागी देठेकर, सुमित कांबळे, विद्या किन्नाके, लता पोरेते, प्रिती मडावी, प्रिती आत्राम, पुरुषोत्तम सोयाम, अमर चांदेकर, रुपा चांदेकर, कौस्तुभ आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे निमीत्ताने दुपारी 3:00 वाजता चंद्रपूरच्या मुख्य मार्गाने बाईक रँली काढण्यात आली होती. सायंकाळी 6:00 वाजता समाज प्रबोधनचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय अशीच होती.