नागभीड तहसीलवर उद्या महाआक्रोश मोर्चा
परिसरातील सर्व सरपंच, शाळा व्यवस्थापन समित्या, पालकांचा समावेश
प्रतिनिधी:सुनिल गेडाम शिरपूर
शासनाने विसच्या आतील पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या विरोधात नागभीड तालुक्यातील सर्व गावाचे परिसरातील सरपंच, सदस्य, सर्व शाळा व्यवस्थापन समित्या व पालकवर्गाच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर ला नागभीड तहसीलवर महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे कोणत्याही शाळा बंद करू नये आणि ग्रामीण भागातील गोर – गरीब शोषित वर्गाच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा करून दिन दुबळ्यांना अंधाराच्या व अज्ञानाच्या खाईत पुन्हा ढकलू नये. अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे.
या महाआक्रोश मोर्चात तालुक्यातील सरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,आणि विध्यार्थीचे पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.तसेच इतरही तालुक्यातील सरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समित्या, व नागरिकांनी शासनाच्या अशा दुटप्पी व तुघलकी धोरणाचा विरोध करून एकजूट होऊन संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरावे. असे आव्हान सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. हेमराज लांजेवार यांनी केले आहे.