ताज्या घडामोडी

पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योद्धा पुरस्कार रहेमान सय्यद यांना प्रदान

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रयत सामाजिक प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा दर वर्षीचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते त्याच अनुषंगाने मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आष्टी तालुक्यातील कडा येथिल सय्यद रहेमान सय्यदअली यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्याकरिता पुरस्कार पत्रकार रहेमान सय्यद यांना हा पुरस्कार सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते बीड येथे रविवार २०मार्च २०२२रोजी प्रदान करण्यात आला.
सदैव आणि सातत्याने सामाजिक आणि पत्रकारीता क्षेत्रांमध्ये स्वतःला वाहून घेत समाजाचा भारवाहक म्हणून कार्य करणारे युवक हे गेले एक दशका पेक्षा अधिक, अगदी युवा अवस्थेमध्ये सामाजिक भान राखून धडपडणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा अर्थातच रहेमान सय्यद यांची आहे.
शेतकरी संघटना,भ्रष्टाचार निर्मूलन समिती
माध्यमातून गोरगरीब दीन दुबळ्या,शेतकरी शेतमजूर वंचित घटकांना संघटनेच्या माध्यमातून आधार आणि धीर देण्याचे काम केले.यासाठी अनेक वेळा आंदोलन, उपोषणे करून न्याय मिळवून दिले.
गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील शेतकरी यांच्या व्यथा आणि दुःख सदैव वेशीवर टांगून शासन दरबारी मांडून त्यांना वाचा फोडणारा पत्रकार अशी त्यांची भूमिका आहे. केलेले आंदोलने हक्कासाठी केलेला निकराचा लढा लेखणीच्या माध्यमातून गुणवंतांना न्याय आणि अन्यायाला फोडलेली वाचा या सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा छोटासा भाग नक्कीच कौतुकास्पद आहे.
बीड येथे रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कार सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकार व सामाजिक कार्याकरिता रहेमान सय्यद यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी
रयत सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक आर जी माने , अँड.संगीताताई धसे ,चित्रपट अभिनेते संतोष वारे, समाज सेवक संतोषी सोहनी, पुणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मुर्केवार,अँड. रंजीत वाघमारे,पुणे येथील समाजसेवक मुक्तांगण चे श्री कांबळे साहेब, सजरी फाउंडेशन पुणे इसाक शेख, द्रोपदा ताई पठारे फाउंडेशन पुणे अध्यक्ष कैलासदादा पठारे , ओबीसी फाउंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण लटपटे , मार्गदर्शक सुनील रांजणकर , मयुर रांजणकर, साथीराम ढोले, गणेश तालखेडकर,प्रमोद रामदासी,व इतर मान्यवर उपस्थित होते.रहेमान सय्यद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close