पाथरी तालुक्यात ढग फुटी झाल्याने हदगाव या गावात महापूर
पावसाने शेतातील सोयाबीन, मका,कापूस,ऊस, जनावराच्या चाराचे मोठ्याप्रमाणात नुकसान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील हदगाव या गावात चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी,नाल्यात झेपावले.त्यामुळे तालुक्यातील अनेक ओढे, नदी,नाले दुथडी भरून वाहत आहेत,त्यामुळे नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे.काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे.सलग दोन दिवस पावसाची आशंका हवामान विभागाने वर्तवली होती.त्यातील पहिल्या दोन दिवसात पाऊस न झाल्याने नागरिक निश्चित होते.मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. आणि हदगाव भागात चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नाल्या झेपावले,त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी,नाले,गोदावरी दुथडी भरून वाहत आहेत,त्यामुळे गोदावरी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे. हदगाव या गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस,ऊस, जनावरांच्या चारा गावातील शेकडो हेक्टर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.