ताज्या घडामोडी

आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात नवागतांचे स्वागत

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्र: 2021-22 मधील इयत्ता 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरू करण्यात आले . याप्रसंगी नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम घेण्यात आला .
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोनबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम पंचायत आल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम , प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, सदस्य स्वप्नील श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार,उपस्थित होते .
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरवर शेख ,उषा गजभिये, पिंकी हलधर, तसेच साई पदमगिरीवार, उपस्थित होते .
कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यानी घ्यावयाची काळजी, स्वच्छता, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, यांचा वापर करून आपण सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवता येते तसेच कोरोनासारख्या आजाराला समाजातून हद्दपार करता येते . सर्वानी प्रयत्न केले तरच आपले गाव कोरोनामुक्त करू शकतो असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक शंकर मेश्राम यांनी केले .
अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
मुख्याध्यापक गजानन लोनबळे यांनी कोविडपासून वाचायचे असेल तर आपण स्वतःवर काही बंधने घालून घेतली पाहिजेत, गर्दी न करता दूर राहिले पाहिजे , सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कार्यक्रमातही सामाजिक अंतर, मास्क, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले .
इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यानी या माहितीचा उपयोग पालक आणि समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले .
संचालन गणेश पहापळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास कारेंगुलवार यांनी केले .
यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर गोबाडे,जाहिद खान, प्रदीप दुधबावरे,, ख्याती कश्यप, हेमलता धाबेकर, सत्येंदर सिलमवार, आरती गेडाम ,सोहेल शेख, ,रुपेश जाकेवार, भीमराव निमसरकार, सचिन मेश्राम, शंकर चालूरकर, शांत मांडोरे, यांचे सहकार्य लाभले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close