ताज्या घडामोडी

अहेरी नगरपंचायत मध्ये आविसचे पाच सदस्य आले निवडून

राजनगरीत सत्ताधारीना धोबीपछाडा..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी नगरपंचायत मध्ये आज १७ प्रभागाच्या मत मोजणी कार्यक्रम पार पाडले आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात निवडणुक लढवण्यात आले.सदर निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे पाच सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहे,यात श्री.विलास गलबले,महेश बाकेवार,सुरेखा गोडसेलवार,मीना ओंडरे,रोजा करपेत आदि निवडून आले आहे.


विशेष म्हणजे अहेरी राजनगरी असुन सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार यांच्या नगरीत प्रथमच आदिवासी विद्यार्थी संघाने उमेदवार उभे केले होते,मतदारांनी कौल देत अविसच्या पाच सदस्याना निवडून दिले आहे.त्यामुळे आगामी होणाऱ्या !प.स.जि.प.निवडणूकावार याचं परिणाम दिसणार आहे.मात्र नगरपंचायत मध्ये सत्ता बसवताना आदिवासी विद्यार्थी संघ किंगमेकर ठरणार हे मात्र निश्चितच आहे.
आज मत मोजणी झाल्यावर अहेरी नगरीत आविसचे विदर्भ सल्लागार जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत जलोष साजरी करण्यात आली.यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती.श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,गुलाब सोयाम,उमेश मौहूर्ले,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम,इरसाद शेख,मिलिंद अलोने,प्रकाश दुर्गे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close