परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:- शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी परभणी जिल्ह्यात ओबीसी आघाडीला अधिक बळ देण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार सईद खान यांच्या हस्ते पाथरी तालुक्यातील देवनांदा येथील सौ. कमलताई बळीराम राठोड यांची “शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख, परभणी” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक ५ जुलै रोजी रोजी देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणुकीनुसार तसेच पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात येत आहे.
नियुक्ती पत्र देताना आमदार सईद खान यांनी सांगितले की, “शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहोचवून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.”
नरेंद्र नगर, देवनांदा, ता. पाथरी येथील रहिवासी असलेल्या कमलताई राठोड या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पाथरी आणि परिसरातील महिला व ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नियुक्तीनंतर कमलताई राठोड यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आणि शिवसेना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.
या वेळी उपनगराध्यक्ष अलोक चौधरी,नगरसेवक, गोविंद हारकाळ, नाईक, चाऊस,लालू खान,सुनंदाताई फलके, मिरा इगवे,वंदना जोंधळे आदी शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.









