शेतकरी बांधवांनो, आता फक्त पारंपरिक शेती नाही… भविष्याची आर्थिक तरतूद करणारी शेती करा!

प्रतिनिधी:राहुल गहुकर
आज शेतीचा वाढता खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकालीन आर्थिक उत्पन्नाचा पर्याय म्हणून चंदन लागवडीकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
🌳 चंदनाचे झाड म्हणजे भविष्यासाठी केलेली जिवंत गुंतवणूक!
योग्य रोपांची निवड, शास्त्रशुद्ध लागवड आणि योग्य देखभाल केल्यास चंदन लागवड शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक संधी ठरू शकते. पण केवळ ऐकीव माहितीवर चंदन लागवड करू नका—आधी योग्य माहिती घ्या, मगच लागवड करा!

यासाठी घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्र, सातारा, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे—
🌿 चंदन लागवड प्रशिक्षण – एक दिवसीय मार्गदर्शन
या प्रशिक्षणात चंदन लागवडीची संपूर्ण माहिती, योग्य रोपांची निवड, लागवड व देखभाल तंत्र, शासकीय योजना व अनुदानाची माहिती, बाजारपेठ व विक्री मार्गदर्शन तसेच तज्ज्ञांशी प्रत्यक्ष प्रश्नोत्तर यांचा समावेश असेल.
📅 दिनांक : 19 जुलै 2026
⏰ वेळ : सकाळी 10.00 वाजता
💰 प्रशिक्षण शुल्क : ₹500/-
📍 स्थळ : घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्र, सातारा, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
📞 संपर्क व नोंदणी :
8600733445 | 9284653257 | 9503056353
🌱 आज चंदनाचे झाड लावा… उद्याच्या पिढीसाठी आर्थिक समृद्धीची बीजे पेरा!
मर्यादित प्रवेश असल्याने आजच आपली नोंदणी करा.
— मुख्य प्रवर्तक
प्रा. डॉ. अजय पिसे









