सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी लागले स्वच्छता मोहीम अभियानाला
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे विविध विभागाचे कर्मचारी मागील तीन दिवसांपासून ग्रामीण रुग्णालय संपूर्ण परिसरासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान परिसरातील केर कचरा स्वतःहून साफसफाई करतांना दिसून आले.
ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.वलके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः डॉ .वलके साहेब हे आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मागील तीन दिवसांपासून दर रोज सकाळी संपूर्ण परिसर साफसफाई करतांना दिसून येत आहे.स्वतःहून रुग्णालयाचे अधिक्षकासह कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतल्याने खरचं वैधकीय अधिकाऱ्यांच्या वृंदासह कर्मचाऱ्यांची प्रशंसा जेवढं करावं तेवढं कमीच….परिसर स्वच्छतेसाठी दुसऱ्या विभागावर अवलंबून न राहता आरोग्य विभागाने यात स्वतः होऊन पुढाकार घेतल्याने खरचं अभिनंदनीय बाब आहे.
आज सकाळी सहजिकच ग्रामीण रुग्णालयात फेरफटका मारले असता रुग्णालयाची संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर दिसत होता.यावेळी रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी केर कचऱ्याची साफ सफाई करतांना व कचऱ्याची योग्यपणे विल्हेवाट दिसून आले.खरच येथील डॉक्टर वृंद व कर्मचाऱ्यांची काम मात्र अगदी प्रशंसनीय आहे असं म्हणायला ही काही हरकत नाही.
सिरोंचा येथील प्रत्येक विभागाने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या आदर्श असं स्वच्छता मोहीम अभियानाची बोध घ्यावं असं मला वाटतं.