ताज्या घडामोडी

माढेळी ते खांबाडा रस्त्यांची जड वाहतूक बंद करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोराचे तहसीलदार यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील माढेळी ते खांबाडा या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे व वेकोली ने रस्त्याने जड वाहतूक पुन्हा सुरु केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहे. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. रस्त्याच्या वाहन क्षमता पेक्षा जास्त ची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे . रस्त्यात खड्डे की खड्डात रस्ते हे सांगणे अवघड आहे . आधीच या रस्त्यांची दुरवस्था असताना पुन्हा जड वाहतूकिने रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहे . मागे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन दिले ३ वेळा आंदोलन केले त्या नंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली व खड्डे बुजविण्यात आले.परंतु आता रस्त्यांची अवस्था बघून असे वाटते की रस्त्यात खड्डे पडले आहे की खड्ड्यात रस्ता आहे . नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे . विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार वरोरा यांना निवेदनाद्वारे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे व जड वाहतूक त्वरित बंद करावी असे निवेदन दिले.
त्वरित जड वाहतूक बंद केली नाही व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. वेकोली ने स्वतःचा स्वतंत्र रस्ता तयार करावा व त्या रस्त्याने वाहतूक वळवावी . यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष बंडू डाखरे , जिल्हा चिटणीस राजेन्द्र वरघणे. ओबीसी तालुका अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे , विनोद कोठारे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close