ताज्या घडामोडी
मा.दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते पोहेटाकळी येथे 16 लक्ष रु.विविध विकासकामांचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मौजे पोहेटाकळी येथे मा.दादासाहेब टेंगसे यांच्या जिल्हा परिषद विकास निधीतून समशान भूमी सरंक्षण भिंत 5 लक्ष रु.,अंगणवाडी दुरुस्ती साठी 1 लक्ष रु.,DPDC मधून शाळा दुरुस्ती साठी 2 लक्ष रु.,राजमाता जिजाऊ योजने अंतर्गत शाळा दुरुस्तीसाठी 8 लक्ष रु.च्या कामाचे उदघाटन माजी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तमराव गोंगे,सरपंच श्यामराव गोंगे,उपसरपंच गणेश गोंगे,जेष्ठ नागरिक अरुनराव बागल, माजी सरपंच बापूराव गोंगे,तंटा मुक्ती अध्यक्ष आबासाहेब गोंगे,अशोक शिंदे,पत्रकार लक्ष्मण उजगरे, सर्व ग्रा.प.सदस्य व नागरिक उपस्थित होते.