ताज्या घडामोडी

पळसगाव येथे मच्छीपालन संस्थेच्या सभासदांचे प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी:यशवंत कुंदोजवार

आधुनिक पद्धतीने मत्स व्यवसाय केल्यास संस्था सभासदांचा विकास शक्य- उपप्राचार्य बि.सी. फलके

चिमुर- मत्स व्यवसाय करतांना पारंपपारीक पद्धती सोबतच आधुनिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. संस्थेकडे असलेले तलाव, सभासद संख्या, मिळणाऱ्या मालाचा दर्जा व उपलब्ध बाजारपेठ याबाबत सकारात्मक समन्वय साधल्यास संस्थेचा पार्यायाने सभासदांचा विकास शक्य आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार मत्स बीज टाकुन उत्पन्न घेतल्यास संस्थेचा आर्थीक विकास होऊ शकतो असे प्रतिपादन सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर चे उपप्राचार्य बि.सी. फलके यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व्दारा संचालीत सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर, सहाय्यक निबंधक चिमुर व जिल्हा निबंधक यांचे वतीने पळसगाव येथील श्रीराम मच्छीपालन सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षणात उपप्राचार्य बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम मच्छीपालन सहकारी संस्थेचे सभापती ज्ञानेश्वर मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणुन उपसभापती शिरेश मेश्राम, सचिव कुलदीप कामडी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात फलके यांनी सहकारी संस्थेचे सभासद व समाज विकासातील महत्व, सहकारी तत्वे व लोकशाही मूल्यांचे तत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शनासोबतच सहकारी कायदा, पोटनियम, नफा तोटा पत्रक, सभासदांची जबाबदारी आदि विविध विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन कुलदीप कामडी यांनी केले. सभासदांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण दरवर्षी आयोजित करावे अशी अपेक्षा आपल्या प्रतिक्रीयेतुन व्यक्ती केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close