ताज्या घडामोडी

जिल्हाधिका-यांची सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाला भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दि. 1 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त अशा (मोड्युलर आयसीयू) २० खाटांच्या अतिदक्षता विभागाला भेट देऊन पाहणी केली.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, यांच्यासह उपस्थित होते.
कोरोनापूर्व काळात गंभीर रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत‌ होते. रुग्णांवर वेळेत व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडतील अशा किमतीत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक झाले होते.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही बाब अत्यंत गांभिर्याने घेत परभणी सामान्य रुग्णालयातील परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ECRT -2 अंतर्गंत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे आयुक्त धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक असे मॉड्युलर स्थापन केलेल्या समितीच्या आयसीयू तयार करण्यात आले असून, ते वापरण्यासाठी तयार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले. या अत्याधुनिक अतिदक्षता विभागाला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे लवकरच याचे लोकार्पण करणार आहेत, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close