उमेद अभियान चिमूर अंतर्गत एकता ग्राम संघाचा उद्घाटन सोहळा संपन्न
ग्रामीण प्रतिमिधी :रामचंद्र कामडी नेरी
येथून जवळच असलेल्या मौजा नवतळा येथे सवर्ण जयंती ग्राम स्वयम रोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानात रूपांतर करण्यात आले. राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) राबविण्यात येत आहे. अभियानाचे संचालन ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केले जाते. गरीब गरिबीतून बाहेर पडू शकतो त्यासाठी त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण गरिबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम सभा उभारणे (गरीब वंचित महिलांचा समावेश स्वयंसहायता गटामध्ये करणे.). सदर संस्थांमार्फत गरिबांना एकत्रित करून त्यांच्या संस्थांची क्षमता, वृत्ती व कौशल्य वृद्धिंगत करणे, वित्तीय सेवा पुरवणे व शाश्वत उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे यासाठी नवतळा येथे एकता ग्राम संघाची स्थापना करण्यात आली. त्याचा उद्घाटन सोहळा पुंडलिक मेश्राम सरपंच नवतळा यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे तुळशीदास शिवरकर उपसरपंच नवतळा, ग्राम संघ अध्यक्ष वर्षाताई सलाम, ग्रामसंघ सचिव नल्लू हजारे, ग्रामसंघ कोषाध्यक्ष कविता वसाके, या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राजेश बारसागडे तालुका अभियान व्यवस्थापक चिमूर, प्रशांत मडावी तालुका व्यवस्थापक चिमूर, मेघदिप ब्राह्मणे तालुका अभियान व्यवस्थापक चिमूर, यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व उपस्थितांना दशसुत्री, शिक्षण, आरोग्य, पिक विमा, बँक कर्ज, बचत गट व विविध योजना यावर सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गटातील महिलांनी गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वागत गीत, प्रश्नमंजुषा, विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सारिका बाहू रे प्रभाग समन्वयक चिमुर तर आभार प्रदर्शन मनीषा कामडी बँक सखी नेरी यांनी केले. या कार्यक्रमात प्रीतम गेडाम बँक सखी नेरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सीआरपी, कृषी सखी, आर्थिक सखी, पशु सखी, गावातील बचत गटांच्या सर्व सदस्य अध्यक्ष सचिव तसेच सर्व गावकरी उपस्थित होते.