वरोरा येथे क्रांतीविर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके शहिददिन व क्रांतीसुर्य धरती आबा बिरसामुंडा जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आंबेडकर चौक वरोरा येथे आदिवासी एकता मंच व्दारा दि.१५ नोव्हेबर २०२२ ला क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके शहीद दिन व क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने संगा समाज बांधवांची वरोरा नगरीतुन वेगवेगळ्या वार्ड मधुन भव्यदिव्य रॅली काढुन आदिवासी संस्कृतीचे दर्शन दाखविण्यात आले.रॅलिचे नेतृत्व तिरु.रमेश मेश्राम,आदिवासी युवा नेता वरोरा,तिरु.शरद मडावी,आदिवासी विकास परिषद,मनोज पेंदोर,स्वप्निल येटे,राज गावंडे,अभय मडावी,शुभम येटे,ह्या समाज कार्यकर्त्यानी केले.संपुर्ण वरोरा शहरातुन सांस्कृतिक दृष्ट्या महापुरुषांच्या वेगवेगळ्या वेषभुषेत व ढोल तासांच्या गजरात ढेमसाच्या तालात रॅलिचे दर्शन इतर समाजाना दाखविण्यात आले.त्यानंतर राञौला सायंकाळी 5.00ते6.00या वेळात तिरु.प्रभाकर पेदोर यांच्या संचाव्दारे गोंडीगीत सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात दोन्हीही महापुरुषांची क्रांतीकारी गीते गायकाचे वाणीतुन गावुन समाज बांधवांना मंञमुग्ध केले.
त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.सर्व सन्मानिय पाहुणे म़ंडळीना विचारपिठावर स्थानापन्न करण्यात आले.सर्व पाहुणे मंडळींनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलित करण्यात आले.
पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरु.गणपत येटे सर यांनी केले.
तर कार्यक्रमाचे उद्घाटक तिरु.शरद मडावी जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी विकास परिषद यांनी उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तिरु.वसंतराव कन्नाके आदिवासी साहीत्यिक तथा सामाजिक विचारवंत यवतमाळ,तिरु.प्रा.डाॅ.मनोज मडावी सामाजिक विचारवत,नागपुर,तिरु.गीतघोष सामाजिक विचारवंत वणी,तिरु.चिंतामणजी आञाम माजी सदस्य,पं.स.भद्रावती,तिरु.रमेश मेश्राम,आदिवासी युवा नेता,तिरुमाय नर्मद्राताई पेंदोर विद्य.संरपंच वडगांव,प्रा.अविनाश पंधरे,तिरु.प्रल्हादजी मेश्राम इंजी.
सामाजिक विचारवंत,या सर्वाची प्रामुख्याने महापुरुष यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमांचे अनुषंगाने अतिशय प्रभावी व प्रेरणादायी समाज बांधवांना मार्गदर्शन झाले.काही लहान मुलांचे गोंडी गीतांवर आधारित नृत्य सुध्दा झालीत.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरु.गजाननराव मेश्राम माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नगरपरिषद वरोरा यांचे अध्यक्षिय भाषण झाले.
अध्यक्षीय भाषणातुन त्यांनी समाज बांधवांना कार्यक्रमाचे अनुषंगाने संदेश देताना म्हणाले कि,सर्व संगा बांधवांना आता कोणत्याही चौकात कार्यक्रम घेण्याची गरजच पडणार नाही.तर पुढील बिरसामुंडाची जयंती आपल्या आदिवासी समाज बांधवांचे हक्काचे स्थळी म्हणजेच सांस्कृतिक भवनाच्या जागेवर होईल.असे आश्वाशित केलेले आहे.अनेक वर्षापासुन समाजाची असलेली समस्या पुर्ण होत आहे.
आपल्या सर्व समाज बांधवांसाठी खरोखरच गर्वाची व स्वाभिमानाची बाब आहे.
शेवटी कार्यक्रमाचे आभार तिरु.सुखदेव मेश्राम सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन तिरु.विनोद आञाम सर यांनी केले.
यामध्ये विशेष करुन तिरु.अनिल कुमरे,तिरु.मनोज पेंदोर ,स्वप्निल येटे,तिरु.राज गावडे,तिरु.जगदिश पंधरे,तिरु.सुनिल पंधरे,तिरु.संभाजी मेश्राम तिरु.मनोज पेंदोर,दिपक गेडाम,सुरज पेंदाम,शुभम येटे, सूर्यभान कुळसंगे, राहुल आञाम आदी मंडळीनी विशेष परिश्रम घेवुन कार्यक्रम व्यशस्वी रित्या पार पाडला.