ताज्या घडामोडी

दारूच्या नशेत असलेल्या दोघांचेही कपडे गायब

पोलीसांनी केली दोघांनाही अटक.

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

अश्लीलता आणि कामवासना मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या मस्तीत सैराट झालेल्या काहींना समाज काय म्हणेल याची भीती आता उरली नाही. असा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरामधील जेटपुरा गेट परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडला, असून एक युवक व विवाहित महिला नग्नावस्थेत आढळल्याच्या धक्कादायक प्रकार काल दुपारी उघडकीस आला आहे.

काल दिनांक 11 सप्टेंबरला जटपुरा गेटजवळ पंचतेली हनुमान मंदिर जे आता सध्याचे कोविड चाचणी केंद्र आहे त्या मंदिराच्या मागे विवाहित महिला व युवक मंदिराच्या चौकीदाराला नग्नावस्थेत आढळले. दुपारच्या सुमारास मंदिराच्या चौकीदाराला काही मंदिराच्या मागे आवाज ऐकू येत असल्याने त्याने खिडकी द्वारे डोकावून बघितले असता त्याला धक्काच बसला व त्यांनी परिसरातील नागरिकांना याबद्दल माहिती दिली. बघता बघता बघ्यांची तोबा गर्दी त्याठिकाणी जमू लागली, यावेळी पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहचायला 2 तास लावला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close