घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
ग्रामीण गृहनिर्माण योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना-ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांचे मासिक मानधन डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत, 2021 पासून Arrieas व इतर बाबी पूर्ण करणेबाबत चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि. 29.02.2024 ला निवेदन सादर केले होते.
त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्यांनी दि. 07 मार्च 2024 ला काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना देखील जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या कामबंद आंदोलन बाबत रितसर निवेदन सादर केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसांपासून काम करीत आहेत.
निवेदन सादर करताना
जिल्हा प्रोग्रामर कु. दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर कु. मीनाक्षी क्षीरसागर, तालुका ऑपरेटर कु. पल्लवी पराते, कु. दर्शना बुरडकर, नितीन वेलपुलवार, अंगद गुंडले, महेश शेळके, प्रकाश घडसे, स्वप्निल भगत, प्रणित बोबाटे, प्रफुल करपे, गौरव सोरते, राजेंद्र खोब्रागडे, सचिन भसारकर, सचिन बुरांडे, पंकज झुरे, राजकुमार बावणे आदिं कर्मचारी होते.