प्रगतशील समाज घडविण्यात महिलांचे योगदान मोलाचे-सौ.भावनाताई नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आपल्या देशात विविध क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे या मध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मोठ्या संख्येने सहभागी आहेत,कौटुंबिक संस्कार,नैतिक मूल्य या बरोबरच उद्दोग,वैद्यकीय क्षेत्र,कला व क्रीडा आशा सर्वच बाबतीत महिला जागरूक असून त्यांचे प्रगतशील समाज घडविण्यात मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन भावनाताई नखाते यांनी केले. दिनांक 08 मार्च 2022 रोजी शिवाजीनगर पाथरी येथे परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या प्रसंगी त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या मंगलताई सुरवसे उपाध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मीराताई सरोदे अध्यक्षा पाथरी तालुका विधानसभा या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सत्कार मूर्ती संगीता वाघमारे पोलीस नाईक तथा दामिनी पथक व याच क्षेत्रातील राजश्री बहिरे पाथरी,वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.स्वाती चव्हाण,लघुउद्योग क्षेत्रातील अनिता गोंगे व शारदा महिपाल, शिक्षण क्षेत्रातील रुख्मिन जाधव,भारतीय सैन्यदलात ज्यांची दोन मुले सेवेत आहेत अशा धीरोदात्त माता कुशवर्ता मानोलीकर,कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंगल मानोलीकर,अध्यात्मिक क्षेत्रातील आशा वाघ,अंगणवाडी क्षेत्रातील सुनीता धनले,बचतगट क्षेत्रात महानंदा देशमुख या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षा भावनाताई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व सन्मानित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल सुरवसे यांनी केले,सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी तर आभार कमल कांबळे यांनी मानले.