ताज्या घडामोडी

बाधीत २०० घरांना तातडीची मदत देऊन नालासरळीकरण व पुलाची उंची वाढविण्यास मंजुरी द्यावी

ढगफुटी , महापुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत बाजार समीतीचे सभापती अनिल नखाते यांनी केली पालकमंत्री नवाब मलीक यांचेकडे मागणी.

पालकमंत्री नवाब मलीक यांनी ई पिक पाहणी सोबतच केली हादगांव बु येथील नुकसानीची पाहणी.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रात्रभर भिज पाऊसानंतर ३० आँगष्ट रोजी पहाटेच्या ४ वा.पासून पाथरी तालुक्यातील हादगाव बु सज्जा मध्ये ढगफुटी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.परीणामी हादगांव बु येथे इंदिरा नगर भागात घराघरात व दुकानात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यासह,किराणा,कापड,सिमेंट यासह साहित्याचे नुकसान झाले असुन जवळपास २०० एकर जमिनीतील पिकात पाणी शिरले होतो.त्यामुळे बाधीत २०० घरांना तातडीने आर्थिक मदत देऊन घरकुल मंजुर करावे यासह पुलाची उंची वाढवून नालासरळीकरण करावे अशी मागणी हादगांव बु येथे गुरुवारी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी पालकमंत्री नवाब मलीक यांचेकडे केली आहे.
पालकमंत्री नवाब मलीक हे गुरूवारी पाथरी तालुक्यात ई पिक पाहणीसाठी आले होते.यापुर्वी बाजार समीतीचे सभापती अनिल नखाते यांनी हादगांव बु.येथील ढगफुटी, महापछर व अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई साठी निवेदन दिले होते.या अनुषंगाने पालकमंत्री मलीक यांनी हादगाव बु.येथे ३० आँगष्ट रोजी चा मुसळधार पाऊस व ढगफुटी त्यानंतर ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली.यावेळी महापुर आलेल्या लेंडीनदीचे नालासरळीकरण करून हादगांव बु.गावातील २०० बाधीत घरांना तातडीने प्रत्येकी १० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी व यांना घरकुल मंजुर करावे.तसेच प्रमुख राज्य मार्ग २५ रस्त्याच्या कामास मंजुरी असली तरी त्यामध्ये पुलाचा सामावेश नाही त्यामुळे पुलाची उंची वाढविण्यासाठी मंजुरी द्यावी व पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी बाजार समीतीचे सभापती अनिल नखाते यांनी पालकमंत्री नवाब मलीक यांचेकडे केली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी,जिल्हाधिकारी आंचल गोयल ,सहाय्यक पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,जि.प.चे माजी अध्यक्ष राजेशदादा विटेकर, जि. प.उपाध्यक्ष अजय चौधरी अति.मु.का.अ.अजिंक्य पवार ,पोलीस उपअधीक्षक श्रवण दत्त ,उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे तहसीलदार श्रीकांत निळे,बिडीओ सुहास कोरेगावे ,पो.नि.वसंत चव्हाण तालुका कृषी अधिकारी व्ही.टी.शिंदे,उप अभियंता डी.एम.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.पाहणी दरम्यान बाजार समीती संचालक नारायणराव आढाव संचालक,पं.स.सभापती सदाशिव थोरात,राजेभाऊ ढगे,विष्णूपंत काळे, सरपंच बिभीषण नखाते, चेअरमन बाबासाहेब नखाते,ग्रा.पं.सदस्य महावीर गोंगे, शेख असफाक ,बी.टी. कदम ,शेख हकीम हेही हजर होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close