बांधकाम कामगारांचे उपोषण मागे सहाय्यक कामगार आयुक्तांशी सकारात्मक चर्चा
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे
इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या न्याय मागण्या करीता स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे २५ नोव्हेबंरला .आमरण उपोषण आयोजीत केले होते.मात्र निवासी जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार सहाय्यक कामगार आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनतंर हे आंदोलन मागे घेतल्याचे पत्र निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने नोंदीत कामगारांच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा लाभ मिळावा,नोंदणी शुल्क न भरता वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा संचाच्या चौकशीची मागणी सह इतर विविध न्याय मागण्यांचे अनेकदा सहाय्यक कामगार आयुक्त यांना तोंडी तसेच निवेदणे दिली.मात्र त्यावर जाणीव पुर्वक दुर्लक्ष करण्यात आले.त्यामूळे सदर विभागाला व प्रशासणाला कामगारांच्या मागण्यांचे गांभीर्य समजावे या करीता २५ नोहेम्बंरला जिल्हाधीकारी यांचे कार्यालया पुढे आमरण उपोषण करण्याचे ठरविण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांचे निर्देशाने सहाय्यक कामगार आयुक्त यांनी संघटनेचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष धनराज गेडाम यांचेशी सकारात्मक चर्चा केली.सरकारी कामगार अधिकारी यांनी दिलेल्या लेखीपत्रा नुसार आमरण उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले.तसे पत्र जिल्हाधिकारी तथा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले.या प्रंसगी राज्याध्यक्ष धनराज गेडाम,प्रसिद्धि प्रमूख जितेंद्र सहारे,प्रमूख संघटक गजानण शेडामे,जिल्हा सचिव सुरेंद्र ढोकणे, पाटील वाळके,निलेश सरकटे,आतीश नन्नावरे,राजदिन गोवर्धन,प्रितेश रामटेके,राकेश गेडाम,गौरव वासड,रमेश वाळके,प्रफुल लेंजे,धम्मादीप वाळके,अमित घडले ,अविनाश वाळके,सचिण जारूंडे,पवण पाल,अंकुश नागुलवार इत्यादी सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.