ताज्या घडामोडी

जन आशिर्वाद यात्रेचे आ. गुट्टे यांनी केले जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक १६ ऑगस्ट रोजी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे फार्महाऊस बबनपिंपळा येथे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना. डॉ.भागवत कराड यांचे आगमन झाले. याप्रसंगी आमदार गुट्टे यांनी या जन आशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत केले. यावेळी पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगाव, पालम तालुक्यातील मौजे पेठशिवनी व बनवस तर गंगाखेड तालुक्यातील मौजे राणीसावरगाव, ईसाद व कोद्री येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्या संदर्भाचे व मौजे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरास १५ वा वित्त आयोगातून निधी देण्यासंदर्भात आमदार गुट्टे यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व कोरियन इंडस्ट्रीज बारामती” यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगाखेड येथे विधवा महिलांचा भविष्यातील उपजीविकेचा प्रश्न सुटावा याकरितां शिलाई मशीनचे वाटप, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांना ५० टक्के सवलतीच्या दराने पीठ गिरणी वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोहळाही संपन्न झाला.
याप्रसंगी आ.मेघना दीदी बोर्डीकर,आ. रमेश आप्पा कराड, आ. अतुल साळवे, माजी राज्यमंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, माजी आ. सुधाकर भालेराव, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, जि प सदस्य किशनराव भोसले राजेश फड यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close