ताज्या घडामोडी

मामा तलावाचे पाणी शेतात शेतीचे नुकसान ,शेतकरी हवालदिल

सिंचन विभागाला विनंती मात्र अद्याप उपाययोजना नाही.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

पावना (रै) येथील मामा तलावालाच लागुन अर्जदारांचा शता सर्वे न. १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, २०० व ५१८ आहे. या शेतात खरीप व रब्बी चे पिक घेतले जातात .बबन परसराम बुरान,
विनोद बबन बुरान,
मीराबाई बबन बुरान,
सदाशिव रामा तुमराम,
नानाजी गोपाळा बुरान,
नीलकंठ गणपती बुरान,
पुंडलिक नागो बुरान ,
रा .पावना ,तालुका भद्रावती
सदर मामा तलावाच्या सांडव्याचे अंदाजे सन २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्तीचे (सिंमेट कांक्रेटींग) काम करण्यात आले त्यावेळी सांडव्याची उंची वाढविली गेली परंतु तलावाचे खोलीकरण कधीच झाले नाही. त्यामुळे पाऊस अधिक झाला तर तलावातील पाणी सांडव्यावरुन निघण्या अगोदरच आमच्या लगतच्या शेतात येत असुन मोठ्या प्रमाणात असलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.
सन २०१६ ला या शेतकऱ्यांचे पिक बुडाले तेव्हा विभागीय उप अभियंता लघु सिंचाई उप विभाग प.स.भद्रावती यांना अर्ज केला परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
या वर्षी निसर्गाचा प्रकोपाने अतिवृष्टी असल्याने तलावाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे संपुर्ण पिक पाण्याखाली आहे. याबाबत अर्ज करण्यास भद्रावतीला सगळे शेतकरी गेले असता उप अभियंता लघु सिंचाई उप विभाग, भद्रावती यांची भेट झाली नाही तेव्हा त्यांना दुरध्वनीवरुन माहिती दिली.
दि. १८/०७/२०२२ ला मौजा पावना (रै) इथे सिंचन विभागाच्या कार्यालयातून अधिकारी शेताच्या बांधावर आले मौक्यावर जाऊन बाधीत शतकऱ्या समक्ष पंचनामा व फोटो घेतले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्वरीत पाण्याचा विसर्ग करुन मिळावा जेणेकरुन शेतीचे नुकसान होणार नाही व भात शेतीची लावणी (रोवणी) करता येईल व भविष्यात आमची शेती पाण्याखाली येणार नाही यासाठी कायमस्वरुपी तोडगा उपाय लवकरात लवकर करावा अशी विनंती केली परंतु त्यावर अजुन काहीही उपाय करण्यात आला नाही .
तलावाचे पाणी शेतात आहे.यावर लवकरात लवकर उपाय करावा जेनेकरुन शेतातील तलावाचे पाणी कमी करावे जेणेकरुन भात पिकाची लागवड व दुबार पेरणी करता येईल.
भविष्यात तलावाचे पाणी शेतात येणार नाही यासाठी कायमस्वरुपी प्राधाण्याने उपाययोजना
करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close