काव्यरचना लिहण्याची प्रेरणा मित्रांकडुन मिळाली -कवयित्री वैजयंती गहुकर
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आपणांस काव्यरचना लिहिण्याची प्रेरणा एका कार्यक्रमात मित्रांकडून मिळाली असे मत चंद्रपूरातील सुपरिचित कवयित्री तथा योगा शिक्षिका वैजयंती विकासराव गहुकर यांनी काल एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले.
साहित्य क्षेत्रातील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत मध्यंतरी मूल नगरीतील पत्रकार भवनात आयोजित एका भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने त्यांना लोकहितचे कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व समाजसेविका अर्चना समर्थ यांच्या हस्ते मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत “सन्मान पुरस्कार “बहाल करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या त्या एक सदस्य असून त्यांच्या ब-याच दर्जेदार काव्यरचना वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या आहेत.
सहज सुचलं काव्यकुंज (व्हाॅट्सअप) गृपवर त्या नियमितपणे आपले लिखाण करीत असतात.
साहित्य लिखाणासोबतच त्या आपल्या योगा शिकवणी वर्गाकडेही तेवढेच लक्ष पुरवितात.