राज्यातील सर्वोत्कृष्ट १० जि.प. सदस्यांमध्ये संजय गजपुरे सन्मानित
राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापती मध्ये ब्रिजभूषण पाझारे सन्मानित …
पुणे येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री नाम. कपील पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार …
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन , महाराष्ट्र , राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा. दिनांक ७ मार्च २०२२ , सोमवार ला केंद्रीय पंचायत राज मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथील अण्णासाहेब साठे सभागृहात संपन्न झाला .
या कार्यक्रमात राज्य स्तरीय पुरस्कार साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट १० जिल्हा परिषद सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टी , चंद्रपुरचे जिल्हा संघटन महामंत्री व जि.प . सदस्य संजय गजपुरे यांना सन्मानित करण्यात आले .
तर राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापतीमध्ये भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांची उपस्थिती होती . याप्रसंगी संजय गजपुरे व ब्रिजभूषण पाझारे यांनीही व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले .