गोवंश हत्या प्रकरणातील केस मधून सर्व ७ आरोंपी ची निर्दोष मुक्तता
जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी
पाथरी पोलस स्टेशन येथे ०१/०८/२०२० बकरी ईद च्या दिवशी पोलीस
उपनिरीक्षक श्री टोपाजी कोरके यांनी फिर्याद दिली होती की, पठाण मोहल्ला पाथरी येथील १) शेख जुनेद पि. शेख मुजीब २) शेख वाहेद पि. शेख मुजीब ३) शेख मूजाहेद पि. शेख मुजीब ४) अमजद अमिरमिया कुरेशी ५) शब्बीर अमिरमिया कुरेशी ६) शेख साबेर पि. शेख मोबिन ७) ताहेर दादामियाँ कुरेशी त्याच प्रमाणे फिर्याद मध्ये वरील आरोपी यांचे ताब्यातून मांस व जिवंत गाय पकडल्याची फिर्याद दिली होती. त्या अनुशंघाने उपरोक्त लोकांविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५ (क) सह ९ (अ) व ११ च्या गुन्हयाची नोंद करण्यात आला व दोषारोप पत्र मा. फौजदारी न्यायालय पाथरी येथे दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात सरकारी पक्षा तर्फे (अभियोग पक्षाने) एकून ६ साक्षीदार मा. न्यायलय समोर तपासण्यात आले. सदर साक्षीराला आरोपी चे वकील अडॅ. मूजाहेद ताहेर अन्सारी यांनी खाळून लावले व जोरदार युक्तीवाद केला. अॅड. मूजाहेद ताहेर अन्सारी यांचा युक्तीवाद गृह धरून व सरकारी पक्षाने उपरोक्त लोकांचे ताब्यातून सदर मांस व जिवंत गाय जप्त केल्याचे सिध्द न करू शकल्याने मा. न्यायधीश श्री. मयूर इ पवार यांनी सदर सात आरोप दिनांक ०६/०१/२०२४ रोजी निर्दोष मूक्त केले आहे. सदर सात ही आरोंपी अॅड. मूजाहेद ताहेर अन्सारी यांनी काम पाहिले. त्याना अॅड. तारेख अब्दूल अन्सारी व अॅड. फूरखान मामामियाँ खान यानी सहकार्य केला.