जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी तालुका मानवत येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध संपन्न झाले. मानवत शहरातील मौजे रुढी येथे दी.10 ऑक्टोबर सोमवार रोजी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व पालकांमधून शाळेला वेळ देऊ शकणाऱ्या सदस्यांची निवड जेष्ठ पालकांच्या अनुमतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या वेळी अध्यक्ष रामप्रसाद उद्धवराव होंडे तर
उपाध्यक्ष सुरेश तुकाराम होंडे, यांची निवड करण्यात आली.
व सर्व सन्माननीय सदस्य: सौ. राधा काशिनाथ पतंगे, बाबासाहेब भिमराव मुळे, नामदेव लक्ष्मणराव मस्के, श्रीमती शमीमबी मुसा कुरेशी, बालासाहेब आश्रोबा निर्वळ, विष्णू रामभाऊ होंडे, सौ. वैजयंता बालासाहेब होंडे, सौ. गंगासागर अंगद होंडे, सौ. सीमा विष्णू निर्वळ, सौ. सत्यभामा किशनराव होंडे,शिक्षण तज्ञ: रामेश्वर शेषराव होंडे ,ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ उत्तमराव होंडे प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.
सर्व सन्माननीय नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे जि. प. प्राथमिक शाळा रुढी,मुख्याध्यापक बी. एन. घनचक्कर सर सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.