नेरी ग्रामपंचायत समोरील रस्ता आपल्या सुधारणेसाठी अश्रू ढाळीत आहे

रस्त्याचे रुंदीकरण केव्हा होणार गावकऱ्यांचा सवाल
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
–चिमुर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत समोरील रस्त्याचे सिमेंटीकरण व रुंदीकरण केव्हा होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे
हा रस्ता आपल्या सुधारणेसाठी अश्रु ढाळीत आहे तरीही याकडे मात्र कोणाचेही मुळीच लक्ष नाही
तालुक्यात नेरी ग्रामपंचायत सतरा सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत असुन लोकसंख्येने पंधरा हजाराचे जवळपास आहे
या गावातील वाहणाची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे रस्ते मात्र आहे तेवढेच आहेत
या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची नेरी वासीयांची ही बऱ्याच दिवसापासूनची जुनीच मागणी आहे
या रस्त्याचे रुंदीकरण सिमेंटीकरण केल्यास गावच्या सौंदर्यीकरणात भर पडेल
पंधरा वर्षापूर्वी चा सिमेंट रस्ता जागोजागी उधळून गेला आहे
वाहनधारकांना धक्के खात जावे लागते कदाचित लोकप्रतिनिधींना या रस्त्याने येतांना अनुभव येत असेलही
तरीही या गावकऱ्यांच्या समस्येवर लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही हे एक आश्चर्य ठरत आहे.
नेरी चिमुर नवरगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे मात्र नेरी ग्रामपंचायत समोरील रस्त्याचे रुंदीकरण केव्हा होणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे हा रस्ता आपल्या सुधारनेसाठी अश्रु ढाळीत आहे प्रशासनातील संबधीतांनी व कैवारु लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे त्वरीत रुंदीकरण करुन सिमेंटीकरण करण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.