मासळ येथे सी. एल.एफ महिला शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)ची वार्षिक सर्वसाधारण सभा

प्रतिनिधीःहेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती चिमूर 10k FPO अंतर्गत स्थापित मासळ सी. एल.एफ महिला शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)ची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.
या सभेमध्ये वर्षभरात केलेल्या कामाचा लेखा -जोखा चे वाचन लेखापाल प्रफुल मेश्राम सर यांनी वाचन करून दाखवले तर सीईओ शुभम रामटेके सर यांनी समोरील वाटचाल उन्नतीच्या दिशेने कशी नेता येईल यावर चर्चा केली तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीता एफ पी ओ चिमूर चे मा.अभिजीत बेहेते सर यांनी मासळ महिला शेतकरी कंपनी कशी भरभराटीला नेता येईल यावर आपले अनुभव व्यक्त केले.रजनी खोब्रागडे मॅडम BM- MIS यांनी उमेद अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले,विवेक हरणे सर BM-IBCB यांनी शेअर धारकासोबत FPO विषयी हितगुज साधली तर सुधीर ठेंगरी प्र.स.सेंद्रिय शेती यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय व या व्यवसायातील संधी यावर चर्चा केली,प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी महिला FPO ची रूपरेषा व त्याच्या फायदे विषयी चर्चा केली.आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व BOD, कार्यक्रम चे अध्यक्ष सौ मनीषा गराटे मॅडम,सपना उराडे (प्रभाग समन्वयक) तसेच उमेद अभियानातील सर्व कर्मचारी व कॅडर उपस्थित होते या वार्षिक सर्वसाधारण सभेला 300 हून अधिक शेअर धारक उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे संचालन CRP रज्जू ताई ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन CRP रीना ताई पाटील यांनी केले.