केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के यांची खडाळा शाळेस भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्राअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथे नवनियुक्त केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के यांनी भेट दिली. इयत्ता सातवीच्या वर्गात विद्यार्थ्यांशी हितगुज साधला. इयत्ता सातवीची विद्यार्थिनी राणी अंगद शिंदे यांनी केंद्रप्रमुखांचे पुष्प देऊन स्वागत केले.विद्यार्थ्यांनी we learn English,
सामान्यज्ञान,आणि उपस्थितीने केंद्रप्रमुखांना प्रभावित केले. शाळेच्या वतीने केंद्रप्रमुख स्वागत व सत्कार सोहळा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष परशुराम हनवते माजी अध्यक्ष कैलासराव शिंदे शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे,प्रल्हाद राठोड,पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे, ज्ञानेश्वर साखरे राहुल काऊतकर आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे यांनी केले. प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के बोलताना म्हणाले की,”केंद्रांतर्गत खडाळा या शाळेची गुणवत्ता आणि लॉकडाऊनच्या काळातील विद्यार्थ्यांचे उपक्रम पाहून मी प्रभावित झालो आहे”. सूत्रसंचालन श्री.पांडुरंग मोरे यांनी केले. तर आभार राहुल काऊतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.