ताज्या घडामोडी

परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीविजयादशमी उत्सव

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 ते शुक्रवार दिनांक 07 ऑक्टोबर 2022 या काळात श्रीविजयादशमी उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना चौधरी म्हणाले की, अश्विन शुक्लपक्ष दशमी म्हणजे विजयादशमी परमपूज्य श्री साईबाबांचा महानिर्वानाचा दिवस असून समाधी मंदिर शिर्डी येथे परमपूज्य श्रीसाईबाबांचा समाधी उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जन्मस्थान मंदिर पाथरी येथे गेल्या 22 वर्षापासून मोठ्या भक्ती भावाने, श्रद्धेने व उत्साहात श्री साई स्मारक समिती, पाथरी तर्फे हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही श्रीविजयादशमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.
तसेच मुख्यत्वेकरून मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी
पहाटे 5:45 वाजता श्रींच्या फोटोची व श्री साईसच्चरित्र ग्रंथाची मंदिर ते द्वारकामाई मिरवणूक निघेल व मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड श्री साईसच्चरित्र पारायणास प्रारंभ होईल, दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत संगीत विशारद श्री ह भ प अंगद गुरुजी डाके, गव्हाणकर, माजलगाव यांची कीर्तन सेवा, बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 5:45 वाजता श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती होईल व श्रींच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक निघेल, सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत संगीत विशारद श्री ह भ प अंगद गुरुजी डाके, गव्हाणकर, यांची विजयादशमी विशेष कीर्तन सेवा होईल, त्यानंतर श्री संतोषराव दिनकरराव चौधरी यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारले जाईल, सायंकाळी 4:30 वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी एकादशीनिमित्त संगीत विशारद श्री ह भ प अंगद गुरुजी डाके गव्हाणकर, माजलगाव यांचे दुपारी तीन ते पाच या वेळेत सुश्राव्य कीर्तन होईल. आणि सांगता दिवशी शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत संगीत विशारद श्री ह भ प अंगद गुरुजी डाके, गव्हाणकर, यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. ज्या साई भक्तांना अखंड पारायणात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी आपली नावे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पूर्वी श्री सुधाकर नारायण बेदरे (मो.7559134128) यांच्याकडे समक्ष किंवा फोन वरून नोंदवावीत. अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close