बायकोला आसरा दिल्याच्या रागातून महीलेवर जिवाघेणा हल्ला;महिला गंभीर जखमी; आरोपीला अटक
ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
नवरा-बायकोचे भांडण झाले.बायकोने शेजारी असलेल्या महीलेच्या घरी आसरा घेतला.बायकोला आसरा दिला या रागातून नवर्याने शेजारी महीलेवर सूरीने प्राणघातक हल्ला केला.यात महीला गंभीर जखमी झाली आहे.जखमी अवस्थेत महीलेला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली असून दर्शना झाडे असे जखमी महीलेचे नाव आहे.
प्राप्त माहीतीनुसार बोरगाव येथिल संघमित्र फुलझेले याचे काही दिवसापुर्वी पत्नीशी भांडण झाले.आरोपीच्या पत्नीने शेजारी असलेल्या दर्शना झाडे हीच्या घरी आसरा घेतला होता.पत्नीला आसरा दिला,याचा राग संघमित्र फुलझेले याला होता. आज ( गुरूवार )फुलझेले याने चांगलीच ढोसली होती.हातात कोंबडी कापण्यासाठी वापरात येणारी सुरी घेऊन तो गावातील रस्त्यावर फिरत होता. रस्त्यावर जो दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता.अश्यात दर्शना झाडे ही महिला पानटपरीजवळ आली.संघमित्र याने पानपटरी मालकावर हल्ला केला होता.मात्र या हल्यातून पानटपरीधारकांने स्वताचा बचाव केला.मात्र तिथे उभी असलेली दर्शना झाडे दिसताच त्याचा राग अनावर झाला.त्याने धाव घेत दर्शना झाडे हिच्या मानेला आणि कानाजवळ सुरीने वार केलेत.ती रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली.या घटनेची माहीती गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिसांना दिली.गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू हे पोलिस जवानांना घेऊन घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या दर्शना झाडे हीला उपचारासाठी गोंडपिपरीला हलविले.आरोपीला ताब्यात घेतले.जखमीवर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास पीएसआय मोगरे, प्रफुल कांबळे, शामराव पूलगमकर ,अमित गुरनुले, नीलरत्न उराडे, पवार करीत आहेत.